Contact

Email Address: pratiqppurkar@gmail.com
Call: 8600430005

logo

logo

Thursday, April 9, 2020

श्रृंखला-ए-महल

श्रृंखला-ए-महल a series of Heritage walk in Mahal locality of Nagpur city.











It is a good initiative by Architectural Sankul, it was a nice experience to join part 2 of this Heritage walk, thanks to Dr.Madhura Rathod & Ar. Nitika Ramani for organizing visit to such places which has socio-cultural importance as a Heritage site of the Nagpur city. History speaks itself through this monumental evidences which reflects rich legacy of our past, we have experienced that in Mahal Nagpur. 

From my childhood i have seen these structures but there was also some unexplored places for me which I have seen first time in this Heritage walk. Being a citizen of Nagpur I feel proud that this heritage still exists & being architect my opinion is to preserve this valuable assets of our city for future generations, need is to explore, documented, restore and conserve these structures.

Ar. Pratiq P. Purkar, Nagpur 


शिव छत्रपति चे चुलते नागपुरकर भोसले घराण्याचा इतिहास

निमित्त होते नागपूरकर भोसले यांनी निर्माण केलेले ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास दौरा परंतु या दौऱ्यानिमित्त काही हाती आलेल्या माहिती, शिसोदे वंशीय क्षत्रिय कुळातील भोसले परिवाराच्या आजमितीस भारतात चार शाखा आहेत त्या अशा 

एक नागपूरकर भोसले 

दोन सातारकर भोसले 

तीन कोल्हापूरकर भोसले

चार तंजावरकर भोसले

यापैकी नागपूरकर भोसले जे मूळचे सातारा येथील हिंगणी या गावचे आहेत यांना हिंगणीकर भोसले असेही ओळखले जायचे या परिवारातील रघुजी प्रथम याला नागपूर वऱ्हाडात गोंड राणी सोमकुवर हिणे गोंड परिवारा मधील नागपूरच्या गादीसाठी उद्भवलेला संघर्षात मदत मागितली, याबदल्यात राणीने रघुजी प्रथम याला नागपुरातील काही भागांची जहांगीरी दिली त्याद्वारे भोसल्यांनी नागपूरात बस्तान बसवले. व पुढे बंगाल बिहार ओडिसा पर्यंत मजल मारत मराठी स्वराज्य वाढवले. या राजघराण्याचे आताचे तरुण वंशज श्री जयसिंगराव भोसले द्वितीय यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हिंगणीकर भोसले हे चारही भोसले घराण्यात ज्येष्ठ आहेत, हे त्यांच्या वंशावळीवर नजर टाकल्यास सही सिद्ध होते. व त्यामुळेच शिवछत्रपतींना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणारे त्यांचे अध्यात्मिक गुरु श्री रामदास स्वामी हे याही परिवाराचे गुरु आहेत, व चारही परिवारात ज्येष्ठ असल्यामुळे ह्या गुरूंची मूर्ती स्थापनेचा अधिकार त्यांनाच मिळालेला आहे व त्यामुळे त्यांच्या देवघरात आजही श्री रामदास स्वामी यांची चांदीची मूर्ती रोज पुजल्या जाते, तसेच परिवारातील वीर पुरुषांच्या नावे असलेली सोन्याची टाक देखील पूजनात असते. नागपूरकर भोसले श्रीरामांना आपले कुलदेवता मानतात परंतु भोसले घराण्याचे मूळ दैवत ही देऊर ची मुधाईदेवी भवानीमाता असल्याचे ते सांगतात. हे भोसले घराणे दरवर्षी गणेशोत्सवही उत्साहाने साजरा करतात ही परंपरा हिंगणी या गावी असले पासून साजरी करण्यात येते किंबहुना लोकमान्य टिळकांनी या परिवाराचे उदाहरण समोर ठेवूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली असा दावा ते करतात. या परिवाराने नागपुरात निर्माण केलेले वैभव इंग्रजांनी आजमितीस नष्ट केले असले तरीही ते सद्यस्थितीत रहात असलेला मोठा राजवाडा येथे हा वारसा जतन करुन ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये त्यांचे मूळ देवघर, शस्त्रागार, अश्वशाला व काही मंदिरे असा परिसर आज नागपुरातील व्यस्त महाल परिसर या नावाने विख्यात आहे तिथे विविध ठिकाणी यांच्या वंशजांचे नावे विवीध वाडे आजही शाबूत आहेत. आपण तिथे महालक्ष्मी उत्सवात व मस्करया गणपती उत्सवात नक्कीच भेट देऊ शकतो.