महारानी बकाबाई भोंसले आणि बकाबाईचा वाडा, महाल नागपुर
महाराणी बकाबाई साहेब (ई. स.१७९०-१८५८) नागपूर घराण्याच्या राजे रघुजी-२ यांच्या पत्नी होत्या. १७५५ साली बांधलेल्या ह्या वाड्याचे अधीकार रघुजी-२ यांना मीळाले लग्नानंतर त्या वाड्यात राणी बकाबाई साहेबांना ठेवण्यात आले पुढे हा वाडा बकाबाईचा वाडा ह्या नावानेच प्रसिद्ध झाला, नागपुर संस्थानाचा संपुर्ण कारभार पुढे ह्या वाड्यातनच चालायचा असे म्हटले तरीही अतिशयोक्ती होऊ नये एवढा प्रभाव महाराणी बकाबाईचा तत्कालीन राजकारणावर होता. रघुजी-३ (मृत्यु १८५५) ह्या अल्पवयीन राजाला दत्तक घेऊन तिने राज्यकारभार केला हे दत्तक विधान लॉर्ड डलहौसीने नामंजूर करूनही तिने प्रसंगी इंग्रजांशी जुळवून घेऊन राजाला व स्वतःला येथील प्रशासक म्हणून नियुक्त करून घेतले व त्यापोटी आपल्या हयातभर १८५८ पर्यंत इंग्रजांकडून पेन्शनही मिळवली, असे म्हणतात की तिने ईंग्रजांविरुद्ध १८५७ चा ऊठाव नागपुरात यशस्वि होऊ दिला नाही म्हणून नागपुरातील जनता निशेध म्हणुन आजही पोळ्याच्या पाडव्यावर तीच्या प्रतिकृतीची मिरवणुक काढतात ज्याला "मारबत" असे म्हणतात.
सध्या हा संपुर्ण वाडा तीन भागात विभाजीत आहे, पुर्वापार हा वाडा भोसल्यांची कचेरी म्हणुन वापरात होताच, येथे निवाडा व्हायचा व कच्च्या कैद्यांचीही व्यवस्था होती आता पुर्वेकडील भाग १९३७ पासन सिटी कोतवाली नामक पोलीस स्टेशन चे वापरतात असुन मध्यभागी १८७० साली निलसीटी हायस्कुल ची स्थापना करण्यात आली जी आता नागपुर शिक्षण संस्था द्वारा संचालीत श्री. दादासाहेब धनवटे नगर विद्यालय या नावे आहे, तर पश्चिमेला त्याच संस्थेचे बिंझानी सीटी महाविद्यालय आहे. नागपुरातील व्यस्त महाल परिसरात हा वाडा आहे, असे भरपुर भोसलेकालीन वाडे व महाल या परिसरात असल्यामुळेच या परिसराचे नावच महाल ठेवण्यात आले.
सदर वाडा १७५५ साली बांधण्यात आला आहे, यावर स्थानिक व तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम शैलीसकटच ब्रीटीश कलोनियल शैलीचाही प्रभाव स्पष्ट जाणवतो, दगडी पायव्यावर भाजलेल्या विटांचे बांधकाम व कमानी यांनी बाह्यभाग सुसज्जीत असुन अंतर्गत काम दगडी व लाकडी असुन छत हे ब्रीटीश पद्धतीच्या लाकडी ट्रसेस वर आधारीत कौलारु आहे. भव्यतेच्या बाबतित हा वाडा कोण्या महालापेक्षा कमी नाहीच, चार चौकांच्या दुमजली वाड्यात असंख्य खोल्या आहेत ज्यामधे आता काही बदल करुन अजुनही वापरात आणल्या जात आहे.
तळटिप: मी देखील याच शाळेत शिकलो, यावर्षीच शाळेचा १५० वा स्थापणादिवस साजरा करण्यात आला होता, आजकालच्या राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व, वैज्ञानिक, कवि, लेखक, चित्रकार ह्या शाळेचे माजी विद्यार्थी होते व २५ वर्षे पुर्वी जेव्हा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला तेव्हा ह्या संपुर्ण शाळेच्या ईमारतीचे मॉडेल थर्माकोल मधे बणविण्याची संधी मला लाभली होती.
© आर्कीटेक्ट प्रतिक पुरकर, नागपुर
0 comments:
Post a Comment