मी कोण?
रमण महर्षिंनी 1936 ते 1939 दरम्यान "मी कोण?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अरुणाचल पर्वतावर तपश्चर्या केली व आपल्या भक्तांना त्यांच्या 28 प्रश्नाच्या उत्तराद्वारे याचे निरूपण केले.
बहुतांश भारतीय साधकांनी तेव्हापासून आपापल्या अध्यात्मिक गुरुंना असले प्रश्न विचारणे सुरु केले, याचे उत्तर त्यांच्या स्वतःच्या अंतर्मनात दडलेले आहे. आज तोच प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारतो तेव्हा मला त्याचे उत्तर ३ कसोट्यांवर देण्याची इच्छा होते. पहिली भौतिक स्थुल, दुसरी वैचारिक व तिसरी अध्यात्मिक.
इथे भौतिक कसोटीची चर्चा व्यर्थ आहे, तर अध्यात्म पातळीवर बोलण्याची माझी सध्यातरी लायकी नाही त्यामुळे उरते फक्त वैचारिक, याला दुसरे कारण असेही की माझ्यावर माझ्या परिवारातून आध्यात्मिक संस्कार झाले असले तरीही भौतिक व आध्यात्मिक या टोकाच्या भूमिकेत शिरण्याचा माझा शिरस्ता नाही त्यामुळे मध्यममार्गी असलेला मी आज इथे वैचारिक पातळीवरच स्वतःचा शोध घेऊ इच्छितो आहे.
उपनिषदातील ब्रम्हरहस्यात सांगितल्याप्रमाणे "अहम् ब्रह्मास्मि" या महावाक्याचा अर्थ 'मी त्या परमेश्वराचा अंश आहे' असा असला तरी माझे आजूबाजूला, अवतीभवती असलेल्या भौतिक व अध्यात्मिक जगाचा मी एक अविभाज्य घटक आहे असे मी मानतो त्यामुळे अवतीभवती होणारा बदल किंवा घडणाऱ्या क्रिया ह्या माझ्यावरही प्रभाव टाकतातच. मी त्या प्रक्रियेने बाधित होतो. माझ्या कौतुकाने मी आनंदित होतो तर माझ्यावर केलेल्या टीकाटिप्पणीमुळे मी व्यथित होतो, मजसंबंधी घडलेल्या एखाद्या क्रियेस मी प्रतिक्रिया देतो कारण मी जिवंत आहे व माझे अस्तित्व आहे मी ह्या समाजाचा घटक आहे त्यामुळे समाजानेही माझी दखल घ्यावी ही अपेक्षा मी नक्कीच करतो. याकरिता लागणारी पात्रता माझ्यात निर्माण व्हावी याचा प्रयत्न मी नेहमीच करत असतो व त्याविषयीचे विश्लेषणही नेहमी करत असतो. माझे ज्ञान सतत वाढविण्याच्या प्रयत्नात मी असतो, डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे वा गीतेतील वचनाप्रमाणे म्हणा सभोवताली व स्वतःमध्ये सतत परिवर्तन होणे क्रमप्राप्त आहे आणि तीच चेतना आहे, तिच माझ्यातही आहे. आपली सृष्टी चलायमान आहे तसाच मी देखील चलायमान आहे त्यामुळे भौतिक व्यवसायिक अगर सांसारिक स्थिरता मिळवण्याची अपेक्षा मी कसा करेल? माझी विशिष्ट अशी कोणती विचारसरणी नाही किंवा एखाद्या वैचारिक गटाचा मी सदस्य नाही किंवा एखाद्या विशिष्ट विचारकाचा मी शिष्य नाही. मला जेव्हा जेव्हा, जे जे योग्य व समर्पक वाटतं तेव्हा तेव्हा, त्या त्या गोष्टींचा स्वीकार करणे यात मला कसलीही न्यूनता जाणवत नाही मी माझ्या व पर्यायाने माझ्या सभोवतालाच्या उत्कर्षासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल करायला नेहमी तयार असतो, तत्पर असतो व त्याप्रमाणेच आचरण करतो.
प्रतिक पुरकर, नागपूर
Who am I
The great spiritual Guru Raman Maharshee did penances at mountain Arunachal during 1936 to 1939 in the search of an answer to question “Who am I” and explained to their followers in the form of answers questioned by them. Same trend was followed by many spiritual practitioners and questioned to their Gurus although they are aware that it is the eternal part of their own. Today when I ask same question to myself the answer would be based of three parameters, first is Materialistic, Second is Intellectual and third one is Spiritual.
Explanation over materialistic parameter is futile here, and I feel myself incapable to discuss over spiritual level so remaining is intellectual. Another reason to discuss the same is that I belongs to such family who adopted some spiritual practices but although materialistic and spiritual are two extreme and opposite to each other, Being Liberal and working on middle managerial profile I always choose middle way-out so here I want to explain myself on the basis of my intellectual parameter.
As per the quote of Bramharahasya from Upnishada “Aham Bramhasmi” means I am a part and parcel of Supreme Power. But for me the supreme power means the Materialistic & Spiritual world around me, sometimes it inspired me, saddened me when I get hatred through it or sometime it make me happy when get appreciated. I have responded to some actions which is the sign of liveliness, my existence as a part of society. Society should notice me is my expectation for that I am always trying to develop such abilities, trying to upgrade my knowledge and skills. As per the theory of Darwin or what Shridmad Bhagwad Geeta quoted the change which is continuous & spontaneous we must have to adopt it, this is conciseness and this make me active, some what unstable physically, mentally and socioeconomically. This also make me independent thinker, I do not follow particular philosophy or ideology nor I am a member of any ideological group or school of thoughts. Whenever and whatever I found appropriate I have adopted it without hesitation. I am always ready to accept positive changes in myself for my betterment and ultimately in the betterment of my surrounding and I always act accordingly.
Ar. Pratik P. Purkar, Nagpur.