कार्पेट, बिल्टअप, सुपर बिल्टअप आणी सेलेबल
बऱ्याचदा गिऱ्हाईकांशी बोलताना असा अनुभव येतो कि ते कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया, व सुपर बिल्टअप एरिया यामधील फरक टक्केवारीने किती असावा याबद्दल विचारणा करतात.
अशा गिऱ्हाईकांना योग्य माहिती देणे हे मी आर्किटेक्टचे कर्तव्य समजतो. बहुतांश बिल्डर यातील तफावतिचाच फायदा घेऊन आपले स्वतःचे गल्ले भरतो व आपल्याकडंन पैसे उकळतो अशी भावना होते, करिता हा लेख प्रपंच.
सर्वप्रथम बघू या कार्पेट एरिया ऊर्फ चटई क्षेत्र म्हणजे काय? तर चार भिंतीच्या आत जिथे चटई अंतरता येते ते चटईक्षेत्र. तर चटई क्षेत्रासोबत चारही भिंती चे क्षेत्रफळ म्हणजे बिल्टअप एरिया. तर चटईक्षेत्र सोबत चारही भिंतीच्या एरिया सकटच इतर सामाईक वापराच्या जागेचे क्षेत्रफळ म्हणजे सुपर बिल्टअप एरिया. या सुपर बिल्टअप एरिया सज्ञेला कुठलाही कायदेशीर आधार नाही तर ही विकासकांनी आपल्या सोयीकरिता बनवलेली सज्ञा आहे.
विकासक हा तुम्हाला विकलेल्या गळ्याला कार्पेट एरिया प्रमाणे विक्री करण्यास बाध्य आहे परंतु तो गाळा बांधण्याकरिता भिंती व कॉलमची सुद्धा आवश्यकता असते म्हणून रेरा कायद्यानेही हा भाग समाविष्ट केलेला आहे परंतु विकासक याव्यतिरिक्तही महत्त्वाचे बांधकाम करत असतो जो आराखड्याचा हिस्सा असते व इतर सुविधांकरिता महत्त्वाचा देखील असतो ज्यामध्ये पॅसेज, जिना, लिफ्ट, कॉमनटेरेस व पार्किंग, सोसायटी ऑफिस, मिटर रुम, पाण्याची टाकी, वगैरे इत्यादी भाग असतात याकरिता लागणारा एरीया विकासकास कुठे मुफ्त तर कुठे विकत घ्यावा लागतो व बांधकामाकरिता ही खर्च करावा लागतो, याकरिता लागलेला खर्च कार्पेट एरिया वर लोड करून त्याने तो विकावा अशी सर्वसाधारण समज आहे व कायदाही त्याला हे ठरविण्याचा अधिकार देतो. परंतु गि-हाईकास कारपेट याव्यतिरिक्तही त्याच्या सेवेत किती एरिया बिल्डरने बनवलेला आहे ही माहिती देण्याकरिता या सुपर बिल्टअप एरिया सज्ञेचे प्रयोजन आहे विक्रीकरिता नाही.
थोड्याफार फरकाने हा सुपर बिल्टअप एरियाच सेलेबल एरीया म्हणून गि-हाईकांना दाखविला जातो ह्या आणि अशा प्रकारचे एरिया आम्ही आर्किटेक लोकच विकासकांना काढून देत असतो व त्याचे त्या प्रमाणात टक्केवारीने कार्पेट एरियाशी सांगड घालून देतो जी जवळपास 20 ते 35 टक्के सुद्धा असू शकते त्यामुळे कार्पेट एरिया च्या किती प्रमाणात सुपर बिल्टअप आहे हे ठोस सांगता येणे शक्य नाही, ते सर्वस्वि इमारतीचा आराखडा व सुविधा यावर अवलंबून आहे.
बिल्डर जर या व्यतिरिक्त इतर जागा आपल्या कार्पेट एरिया सोबत जोडून आपणास विक्री करत असेल तर ते व्यवस्थित खात्री नुसार माहिती करून व त्याची कायदेशीर वैधता तपासून आपण खरेदी करावी.
प्रतिक पुरकर, नागपुर
0 comments:
Post a Comment