भारतीय सभ्यता वेध अस्तित्व आणी भविष्याचा २
हरियाणातील हिस्सार येथील घघ्घर नदीकाठी असलेल्या राखीगढी या गावी आढळलेल्या 4500वर्ष जुन्या मानवी सांगाड्याचे जनुकीय विश्लेषणाच्या प्रयोगात आर्य वंशाचे जनुकीय गुणसूत्र आढळले नाहीत म्हणजे सिंधू सरस्वती सभ्यता आर्यांची नव्हती ती मूळ भारतीयांची होती असे सिद्ध झाले आहे मग हे आर्य भारतात आले कुठनं हा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. कारण प्रचलित मत व सिद्धांताप्रमाणे प्रमाणे उत्तर भारतीय हे आर्यांचे वंशज मानले जाते त्यांच्या साठी ani हे परिमाण वापरल्या जाते तर दक्षिण भारतीयांसाठी म्हणजे द्रविड वंशजांसाठी asi हे परिमाण वापरल्या जाते तर मूळ भारतीय aasi हे परिमाण वापरल्या जाते.
Ancient Ancestral South Indians (AASI).
Europeans, Ancestral North Indians (ANI) Andaman Islands, Ancestral South Indians (ASI).
Ancient Ancestral South Indians (AASI).
Europeans, Ancestral North Indians (ANI) Andaman Islands, Ancestral South Indians (ASI).
2018 साली याच बाबतीत झालेल्या अध्ययनात ह्या बाबी उद्धृत करण्यात आल्या होत्या त्यावेळीही राखीगढी येथील अवशेष हे ani नसून asi असल्याचा दाखला दिला होता आणी आर्य आक्रमण वा पलायन सिद्धांतास नाकारण्यात आले नव्हते मग आता असे काय घडले की जुनी आर्य आक्रमण नाकारण्यात आली तर ते असे की आताचा प्रयोग हा विश्वव्यापी असा होता ज्यात पुरातत्वशास्त्र, अनुवांशिकशास्त्र, इतिहासकार असे एकूण 28 च्या आसपास तज्ञ मिळून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे डॉ. राय, डॉ. रिच, डॉ. शिंदे, डॉ.नरसिंहन यांनी आर्य हा शब्दच नाकारलेला आहे मुळात आर्य कोण आम्ही त्यांना ओळखत नाही असे त्यांचे म्हणणे आहे त्यांना आढळलेले जनुकीय गुणसूत्र मिश्र स्वरूपाची आहे ज्यामध्ये पश्चिमी इराणी कृषक नव्हे तर त्यांचे पासून वेगळे झालेले पूर्व इराणी व अंदमानी (शिकारी टोळी) असे मानवाचे गुणसूत्र गवसले आहेत जे बारा ते दहा हजार वर्षापासून ह्या सिंधू खोऱ्यात स्थायिक आहेत व त्यांनीच येथे नागरी व कृषक संस्कृती वाढीस लावली यामध्ये पश्चिमी इराणी बहुल व काळ्या सागराभोवतालील (कृषक, पशुपालक टोळी) मानवांचे गुणसूत्र साधारण चार हजार वर्षापासून वाढीस लागले त्याकरिता विदेशी पश्चिमी आक्रमण जबाबदार नसून हा अनुवंशिक बदल फार हळुवार व सतत विकसित झाला आहे याचा निष्कर्ष असा निघतो की तथाकथित आर्य हे शे-दीडशे वर्षांत एकदम एकत्र बहुसंख्येने आले नसून हजार एक वर्षे पासून त्यांच्यात देवाण-घेवाण सुरू होती जी जनुकीय मिश्रणास कारणीभूत ठरली व त्यामुळेच गोरे गोमटे उंच माथ्याचे पशुपालक शाकाहारी असे आर्यांचे वंशज हे उत्तर भारतीय ठरतात तर त्याविरुद्ध इतर हे दक्षिण भारतीय द्रविडी ठरवल्या जातात हा भेद जनुकीय शास्त्राचे दृष्टीने फार गौण आहे परंतु आतापर्यंतचे इतिहासकारांनी तो सतत चर्चेत व वाढीस ठेवला अन्यथा मागील आठ ते दहा हजार वर्षांचा इतिहास बघता संपूर्ण भारत व भारतीय मिश्रअणुवांशिकीय गुणसूत्रांनी बनलेले आढळतात त्यामुळेच ते सर्व बाबतीत श्रेष्ठ ठरतात कारण विविध प्रजातीतील हे गुणसूत्रीय संकर हे त्या प्रजातीस लाभदायकच बदल घडवत असतात व सतत विकसित होत असतात व हाच विकास evolution सृष्टीसही हवा असतो त्यामुळेच आज आपण भारतीय सर्व क्षेत्रात व सर्व देशात चिवटपणे टिकलेले आढळतात.
आता प्रश्न हा उभा राहतो की मग हा आर्य द्रविड भेदभाव का सिंधू सरस्वती सभ्यता कुणाची हे जाणून घेण्याची उत्कंठा का तर आज जगात व भारतात असलेल्या विविध धार्मिक व वांशिक विचारधारांना एक प्रबळ असा ऐतिहासिक वारसा हवा आहे परंतु सिंधू-सरस्वती सभेतील हे संशोधन कोण्या एका धार्मिक वैचारिक वा वांशिक विचारधारेचे सहाय्यक होईल किंवा नाही हे सांगणे सध्या तरी कठीण आहे कारण आपण अजूनही अशाच काही सभ्यत्यांचा धर्म, वंश अजूनही माहीत करू शकलेलो नाहीत.
© प्रतिक पुरकर, नागपुर