भारतीय सभ्यता वेध अस्तित्व आणी भविष्याचा १
शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2019 हा भारतीयांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस होता या दिवशी समस्त भारतीय त्यांच्या पुढार्यासह एका वैज्ञानिक प्रयोगाकडे डोळे लावून बसले होते जे आधुनिक भारताचे भविष्य घडविण्याच्या मार्गातील एक महत्त्वाचा मैलाचा टप्पा होता, विश्वगुरू होण्याच्या एक संकेत होता ते म्हणजे आपले चंद्रयान 2 चे सफल परीक्षण परंतु यासोबतच त्याच दिवशी आपण सगळे अजून एका घटनेचे साक्षीदार होणार होतो जे समस्त भारतीयांच्या अस्तित्व व भूतकाळातील ओळखीच्या संबंधित होते, ते म्हणजे सिंधू-सरस्वती कालीन सभ्यतेतील राखीगढी येथे आढळलेल्या मानवी सांगाड्याचे गुणसूत्रीय विश्लेषण.
या दोन्ही बाबी मूलतः वेग वेगळ्या आहेत, एक आपणास भविष्याकडे घेऊन जाते तर दुसरी आपणास मागे भूतकाळात डोकविण्यास भाग पडते परंतु ह्या दोहोंचा गाभा मात्र वैज्ञानिक आहे हे दोन्ही प्रयोग भारतीय प्रगतिशील विज्ञानाची कास धरणारया नव्या भारताचे मानचित्र विश्व समूहासमोर उभे करते.
आजचा भारत हा जात धर्म पंथ निरपेक्ष मार्गाने प्रगतीची वाटचाल करत असला तरीही काही अधोगामी विचारसरणी येथून कायमची हद्दपार झालेली नाही, वेगवेगळ्या उच्च-नीच जाती,पंथ, धर्म, रंगभेद व भाषा यामध्ये विखुरलेला भारत यांना कायम हवा आहे, अशा खंडित भारताचे हे मनसुबे रचून आहेत. याउपर विविधतेने नटलेल्या एकत्रित व एकसंघ भारत हीच आपल्या पुढच्या पिढीची मागणी आहे व त्याच भविष्याचा वेध घेत आहे, याला आणखी बळ मिळाले ते डॉ. वसंत शिंदे, डॉक्टर राय व डॉक्टर डेविड रिच यांच्या दिनांक 6/7/ 19 रोजी द सेल या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या शोधप्रबंधामुळे ज्याचा निष्कर्ष असा आहे की राखीगढी येथील उत्खननात सापडलेल्या मानवी सांगाड्याचे गुणसूत्र हे भारतीय म्हणजेच दक्षिण आशियाई आहे त्यात कुठलाही परकीय व इराणी गुणसूत्र नाही त्यामुळे ही जी सिंधू-सरस्वती सभ्यता आहे ती मूळ भारतीय आहे व पाच हजार वर्षापूर्वी भारतीय कसे प्रगत होते, नागरी जीवन जगत होते, स्वयंपूर्ण शेती ज्ञानाने परिपूर्ण होते जे कुठल्याही परकीय आक्रमणाने नष्ट झाले नाही तर जलवायू परिवर्तनामुळे त्या सभ्यता व ती शहरे नष्ट झालीत व तद्नंतर आपल्यात आढळणाऱ्या वैविध्यते साठी इतर मानव समूह सोबत सततची व अविरत होणारी देवाणघेवाण जबाबदार आहे कुठलेही परकीय आक्रमण वा स्थलांतर नाही.
© प्रतिक पुरकर, नागपुर
0 comments:
Post a Comment